Site icon Aapli Baramati News

Big Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना; ट्विटरवरुन दिली माहिती

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सत्तासंघर्ष सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल त्यांनी याबाबत चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत अजितदादांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. या काळात संपर्कात आलेल्यानी चाचणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन अजितदादांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version