Site icon Aapli Baramati News

Big Breaking : सहावी जागा भाजपने जिंकली; कॉंग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव, प्रसाद लाड, भाई जगताप यांचा विजय..

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत सहावी जागा मिळवण्यात भाजपला यश आले आहे. तर कॉंग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रसाद लाड आणि कॉंग्रेसचे भाई जगताप यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

विधानपरिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीत भाजपचे चार आणि महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले. तर कॉंग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्या पहिला पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही. त्यामुळे या तिघांचीही दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली.

दुसऱ्या फेरीमध्ये प्रसाद लाड आणि भाई जगताप यांचा विजय झाला. तर चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला. हंडोरे यांचा पराभव कॉंग्रेससाठी पर्यायाने महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी कॉंग्रेस आणि शिवसेनेची मते फुटल्याचे या निकालामुळे समोर आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version