मुंबई : प्रतिनिधी
माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने जामीनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्याच अनिल देशमुख हे कारागृहाबाहेर येतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने यावर स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. त्यावर सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेत जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र ही याचिका फेटाळत न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून उद्याच ते कारागृहाबाहेर येणार आहेत.