मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बहुमत चाचणीसाठी आजपासून दोन दिवसांचे विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सहभागी होणार आहेत. अजितदादांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून ते नियमीत कामकाजात सहभाग घेणार आहेत.
याबाबत अजितदादांनी ट्विटरवरुन माहिती देत आपण विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार हे विधीमंडळ कामकाजात येतात की नाही याबद्दलच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
राज्यात सत्तानाट्य सुरु असतानाच अजित पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी मुंबईतील निवासस्थानी राहूनच उपचार सुरु केले होते. या दरम्यान, अजितदादांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.