Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : कालच्या भेटीनंतर अजितदादा आज पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला; आमदारांचीही उपस्थिती..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थक आमदारांसह वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी काल अजितदादांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुपारी अजितदादा आपल्या समर्थक आमदारांसह वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. त्यानंतर शरद पवारही या ठिकाणी दाखल झाले.

ही भेट नेमकी कशासाठी याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अजितदादांसोबत तब्बल ३० आमदार हे या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीचं कारण आता बैठकांच्या सत्रानंतरच स्पष्ट होणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version