Site icon Aapli Baramati News

Big Breaking : अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल; ‘या’ कारणामुळे दाखल झाला गुन्हा..!

ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिका केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टिका करत तुम्ही मसणात जा असं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपाली सय्यद यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. 

‘किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा …… पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल’ असे दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने दिपाली सय्यद यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version