Site icon Aapli Baramati News

पवारसाहेबांचा अमेरिकेतून फोन आला अन् क्षणात राजीनामा दिला : विनायक मेटे

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या  विधिमंडळाचे  अर्थसंकल्पीय  अधिवेशन चालू आहे. शिवसंग्रामचे पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतच्या आठवणींबद्दल आवर्जून एक किस्सा त्यांनी सांगितला. पवारसाहेबांचा अमेरिकेतून फोन आला, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. मी क्षणातच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची आठवण विनायक मेटे यांनी सांगितली.

विधान परिषदेच्या दहा आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. विनायक मेटे म्हणाले, राज्यातील १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्ता मेघे यांचा पराभव झाला होता. तरीदेखील त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. त्यावेळी मी आमदार होतो. मात्र राष्ट्रवादीतील कोणताच नेता दत्ता मेघे यांच्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार नव्हता.

त्यावेळी पवार साहेब अमेरिकेमध्ये परदेश दौऱ्यावर होते. त्यांनी मला तेथून फोन केला आणि  मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. मी त्यावर तुम्ही पक्षप्रमुख आहात, त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते होईल असे सांगून कोणताही विचार न करता क्षणातच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, अशी आठवण विनायक मेटे यांनी निरोपाच्या भाषणात विधान परिषदेच्या सभागृहात सांगितली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version