आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

‘या’ कारणासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाची निवड आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यांवर या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री सतेज पाटील यांचा समावेश होता.

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर या प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी विनंती शिष्टमंडळाकडून राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांसोबत विधानसभा अध्यक्षांची निवड आणि १२ आमदारांच्या नियुक्तीच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांच्याकडूनही सकारात्मक आणि अपेक्षित उत्तरे मिळाल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us