Site icon Aapli Baramati News

SHOCKING : ऐकावं ते नवलच.. मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर अन् आईनेच लग्नाच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत केला पोबारा..!

ह्याचा प्रसार करा

उत्तराखंड : वृत्तसंस्था

लग्न म्हटलं की घरात आनंदाचे वातावरण असते. जो-तो आपापल्या परीने लग्नाची तयारी करत असतो. नवरा-नवरीसाठी तर हे दिवस खास असतात आणि आई-वडिलांचा आनंद तर वेगळाच असतो. मात्र उत्तराखंड राज्यातील हरीद्वार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचे लग्न अवघ्या १० दिवसांवर आलेले असताना आईनेच आपल्या प्रियकरासोबत पोबारा केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, मुलीसाठी आणलेले दागिनेही तिने लंपास केले.

याबाबत माहिती अशी की, हरिद्वारमधील मंगलौर परिरसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेच्या मुलीचे लग्न ठरले होते. वर्षभरापूर्वीच या महिलेच्या पतीचं निधन झालं होतं. ३ मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये असलेल्या या महिलेचे तिच्यासोबत काम करणाऱ्या एका युवकाशी प्रेमसंबंध जुळले होते. अशातच तिच्या मुलीचे लग्न १४ डिसेंबर रोजी होणार होते.

लग्नामुळे घरातील वातावरण आनंदमय झालेलं होतं. सर्वजण आपापल्या तयारीत मग्न होते. पाहुण्यांचीही वर्दळ सुरू होती. लग्नासाठी वधू-वरांच्या कुटुंबीयांनी दागिन्यांचीही खरेदी केली होती. अशातच मुलीची आई तिचा प्रियकर राहुल याच्यासोबत पळून गेली. इतक्यावरच न थांबता तिने मुलीच्या लग्नासाठी आणलेले दागिनेही लंपास केले. अचानक मुलीची आई गायब झाल्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शोध घेतला असता ती तिच्या प्रियकरासोबत निघून गेल्याचे समोर आले.

या घटनेनंतर घराची झाडाझडती घेतल्यानंतर लाखो रुपयांचे दागिनेही गायब केल्याचे आढळले. यानंतर संबंधित कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित महिला आणि तिचा प्रियकर एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्याचे सातत्याने घरी येणे-जाणे होते. त्यातूनच त्यांनी घरातील लग्न अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपलेले असताना दागिन्यांसह पोबारा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संबंधित कुटुंबीयांना या घटनेने धक्का बसला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version