Site icon Aapli Baramati News

SAD DEMISE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आई हिराबेन मोदी यांचे वृद्धापकाळाने निधन

ह्याचा प्रसार करा

अहमदाबाद : प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या १०० वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांनी जीवनाचे ९९ पूर्ण करून १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. स्वतः नरेंद्र मोदी यांनी पहाटे ट्विट करत त्यांच्या आईच्या निधनाची दुःखद माहिती देत श्रद्धांजली वाहिली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची बुधवारी प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच नरेंद्र मोदी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांनी आईला भेटून तब्येतीची विचारपूस केली होती.मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

हिराबेन मोदी यांच्या अंत्यसंस्कारासाठी नरेंद्र मोदी हे गांधीनगरमध्ये दाखल झाले आहेत. हिराबेन मोदी यांच्यामागे नरेंद्र मोदी, पंकज मोदी, सोमभाई मोदी, अमृतभाई मोदी, प्रल्हादभाई मोदी ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने समाजातील विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version