Site icon Aapli Baramati News

आता देशातील ६१०० रेल्वेस्थानकांवर मिळणार मोफत वायफाय

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे देशाला डिजिटल बनवण्यासाठी भारत सरकार अनेक पावले उचलत आहे. आता सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे देशात तब्बल ६१०० रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे.

रेल्वे टेलिकम्युनिकेशन कंपनी रेलटेल सोबत इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Google Inc. ने रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा देण्यासाठी रेल्वे भागीदारी केलेली आहे. देशातील हॉट स्टेशन याला अपवाद असणार आहेत.

उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागातील उबराणी रेल्वे स्थानकावर  वाय-फायची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर ६१०० रेल्वे स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे रेलटेलने प्रसिद्ध  केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version