Site icon Aapli Baramati News

CORONA UPDATE : कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ; देशात ११६ नवे रुग्ण, तर तिघांचा मृत्यू, महाराष्ट्रात ‘इतके’ सक्रिय रुग्ण..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ४१७० इतकी झाली आहे. तर काल दिवसभरात ११६ नवीन रुग्ण आढळले असून कर्नाटकमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात जवळपास २९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटनस्थळावरील गर्दी वाढल्यामुळे पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशात एकूण ४१७० एवढे सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. काल दिवसभरात ११६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून २४ तासात २९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे कर्नाटकमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे केरळ राज्यात नव्याने एकही रुग्ण आढळला नाही. तसेच ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये सध्या ३०९६ सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात १६८ सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १६८ इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासकीय पातळीवर दक्षता घेतली जात आहे. सध्या तामिळनाडूमध्ये १३९, कर्नाटकमध्ये ४३६ सक्रीय रुग्ण आहेत.

गोव्यात JN.1 चे सर्वाधिक रुग्ण

गोव्यात JN.1 या नवीन व्हेरीयंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आजवर गोव्यात JN.1 चे ३४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या नवीन व्हेरीयंटचे १० रुग्ण आढळले असून कर्नाटकमध्ये आठ, तामिळनाडूमध्ये चार, केरळमध्ये सहा आणि तेलंगणामध्ये दोन रुग्ण आढळले आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version