Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : ज्येष्ठ नेते शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा येत्या ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेमध्ये ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार ८ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार चालू आहेत. काल त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथे चालू असलेल्या शिबिरामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदवला होता. आज त्यांनी शिर्डीत चालू असलेल्या शिबिरामध्ये हजेरी लावली. प्रकृतीमुळे ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ते भारत जोडो यात्रेमध्ये होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्यांचे आमंत्रण शरद पवार यांनी स्वीकारले होते. त्यानुसार शरद पवार भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version