Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी..!

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दिल्लीतील गडकरी यांच्या निवासस्थानी फोन करुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, गडकरी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी पोलिस यंत्रणेला माहिती दिली असून पोलिसांनी संबंधितांचा शोध सुरु केला आहे.

यापूर्वीही गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी काही लोकांना ताब्यातही घेतले होते. त्यानंतरही पुन्हा धमकीचा फोन आल्यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. केंद्रातील महत्वाच्या मंत्र्याला सातत्याने धमकीचे फोन येतात ही धक्कादायक बाब असल्याने आता याबाबत काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version