Site icon Aapli Baramati News

माहेरहून पैसे आणण्यासाठी सुरु होता जाच; ‘त्या’ विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

ह्याचा प्रसार करा

पिंपरी : प्रतिनिधी

माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरती सुनील खडसे (वय २१ वर्षे, रा. रामनगर, गव्हणेवस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

भोसरी पोलीसांनी विवाहितेचा पती सुनील खडसे, सासरे त्र्यंबक खडसे, सासू, चार नणंद आणि एका नणंदेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती सासरी नांदत असताना सासरच्या मंडळी माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. 

हा संपूर्ण प्रकार ७ मे २०२१ ते ३ मार्च २०२२ दरम्यान सुरू होता. सततच्या पैशांच्या मागणीमुळे राहत्या घरी दोरीच्या  सहाय्याने गळफास घेऊन आरतीने आत्महत्या केली. याप्रकरणी आरतीच्या वडिलांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version