Site icon Aapli Baramati News

मिरवडीत जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

ह्याचा प्रसार करा

यवत : प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील मिरवडी येथे ग्रामपंचायत मिरवडी आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या माध्यमातून जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृतीही करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी गजानन डोईफोडे आणि परिचारिका श्रीमती मुळुक यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना तंबाखू सेवन न करण्याची शपथ देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीबाबत चित्रे, रंगरंगोटी करून जनजागृती केली जात आहे.

मिरवडी गावात सुरू असलेल्या या प्रयत्नांना ग्रामस्थांचे सहकार्य लाभेल असा विश्वास सरपंच सागर शेलार यांनी व्यक्त केला. गावात विविध उपक्रम राबवताना ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असते. त्यामुळे अनेक योजना यशस्वी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उपसरपंच शांताराम थोरात, चेअरमन बाळासाहेब शिंदे, ग्रामसेवक श्रीमती जाधव यांच्यासह ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version