पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेतच लागणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी पोस्ट ऑफिसने स्वतः च्या वाहतूक यंत्रणेने उत्तरपत्रिकांचा गठ्ठा शिक्षकांकडे पाठवला आहे. त्यामुळे पालकांची काळजी मिटली आहे.
दरवर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शिक्षकांकडे लगेच जायचे. त्यासाठी एसटीचा वापर करून हे गठ्ठे शिक्षकांकडे पोहोचवले जायचे. परंतु काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप असल्याने एसटी आगारात वापराविना पडून आहेत. त्यामुळे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल उशिरा लागणार की काय अशी काळजी पालकांसह विद्यार्थ्यांना लागली होती.
इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपरचे गठ्ठे पोहोचवण्यासाठी पोस्ट ऑफिसने पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या वाहतूक यंत्रणेचा वापर करून उत्तरपत्रिकांचा गठ्ठा शिक्षकांकडे पाठवला आहे. राज्य सरकार त्याचा खर्च देत असून पालकांसह विद्यार्थ्यांची काळजी मिटली आहे. त्यामुळे यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल वेळेतच लागणार आहे.