आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

Crime News : मद्यपी मित्रांमध्ये पैशातून झालेल्या वादातून एकाचा मृत्यू; तीन तासात भोर पोलिसांनी उघड केला गुन्हा

पुणे
ह्याचा प्रसार करा

भोर : प्रतिनिधी

दोन मद्यपी मित्रांमध्ये पैसे देण्या-घेण्याच्या वादातून झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाला. भोरमधील स्मशानभूमीच्या शेडमध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी भोर पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपीला अटक केली आहे. अक्षय कन्हैया गायकवाड (वय 31, रा. बौध्दनगर एस.टी. स्टँड जवळ) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. देवराम लक्ष्मण माने (वय 32, रा. नारायणपूर, ता.पुरंदर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत अक्षय आणि आरोपी देवराम हे दोघे मित्र असून दोघांनाही दारुचे व्यसन आहे.  शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघेजण स्मशानभूमीच्या शेडमध्ये दारु पीत बसले होते. त्यावेळी अक्षयने आरोपी देवरामच्या खिशातून १८० रुपये काढून घेतले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर मारामारीत झाले.

देवरामने अक्षयच्या छातीवर आणि गुप्तांगावर दगड मारले. या घटनेनंतर आरोपी देवराम पळून गेला. अक्षयचा भाऊ विजय गायकवाड याने त्याला शासकीय़ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेनंतर आरोपी देवराम हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला भोलावडे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ ताब्यात घेतले.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us