Site icon Aapli Baramati News

गुऱ्हाळाच्या नावाखाली ऊस उत्पादकांची दलालांकडून लूट; दौंड तालुक्यातील धक्कादायक प्रकार..!

ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

गुळाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दौंड तालुक्यात ऊस उत्पादकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून काही दलाल ऊस गुऱ्हाळाला नेला जात आहे. मात्र पैसे देण्याच्यावेळी मात्र कारणं पुढे करून संबंधित शेतकाऱ्यालाच धमकी देण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गूळ उत्पादित होतो. तालुक्यात ठिकठिकाणी गुऱ्हाळ चालवले जातात. मात्र या गुऱ्हाळांच्या नावाखाली काही दलालांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काढणीला आलेल्या उसाला चांगला दर देतो, अधिकचे पैसे देतो, रोख रक्कम देतो असे सांगून शेतकऱ्यांना फसवले जात आहे.

जादा पैसे मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी ऊस देतात. मात्र पैसे द्यायच्या वेळी हे दलाल गायब होतात. गुऱ्हाळाला ऊस दिल्यानंतर पैसे घ्यायचे कुणाकडून असा प्रश्न संबंधित शेतकाऱ्यांसमोर उभा राहत आहे. विशेष म्हणजे पैशांची मागणी केलीच तर त्यांना धमकी देण्याचे प्रकारही घडले आहेत.

या टोळीच्या उद्योगांबद्दल यवत आणि दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या टोळीचा पर्दाफाश झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता या टोळीचा शोध घेण्याची आग्रही मागणी केली आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दलालांकडून नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे आता दौंड आणि यवतचे पोलिस या दलालांचा शोध कधी घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version