दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील जिरेगाव विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुधीर पाटसकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीनाथ बाबा पॅनलने वर्चस्व मिळवले आहे.
जिरेगाव सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनल आणि श्रीनाथ बाबा पॅनल यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत श्रीनाथ बाबा पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला. सोसायटीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच निवडणूक झाली.
गेल्या २५ वर्षांपासून ॲड.सुधीर पाटसकर यांनी या सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. या निवडणुकीसाठी दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांचे सहकार्य लाभल्याचे सांगत पाटसकर यांनी त्यांचे आभार मानले.