Site icon Aapli Baramati News

जेजूरीत येत्या सोमवारी खंडेरायाची सोमवती यात्रा; यात्रेमुळे १३ नोव्हेंबर रोजी वाहतुकीत होणार बदल

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५  वाजेपासून ते रात्री १०  वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल

सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे यामार्गाने वळविण्यात येत आहे. . पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात येत आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल: बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुक बदल

पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध  १३  नोव्हेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रे’करीता येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version