आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

SHOCKING NEWS : भाटघर धरण परिसरात कुटुंबासह पर्यटनासाठी आले, पोहताना अंदाज चुकला अन बापलेकीला गमवावा लागला जीव..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

भोर : प्रतिनिधी   

पुण्यातील भोर तालुक्यातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. भाटघर धरण परिसरातील बॅकवॉटरनजीक वेळवंड पांगारी खोऱ्यातील जयतपाड येथे कुटुंबासह पर्यटनासाठी आलेल्या बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोहताना अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.

ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (वय १३) आणि शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५, रा. औंध, पुणे) असं या दुर्घटनेत मृत पावलेल्या बापलेकीचं नाव आहे. सलग सुट्ट्या असल्यामुळे धर्माधिकारी कुटुंबीय जयतपाड येथे पर्यटनासाठी आले होते. हे सर्वजण काल मंगळवारी दुपारी इथे असलेल्या एका रिसॉर्टच्या मागील बाजूस असलेल्या भाटघर धरणाचे बॅकवॉटर आणि धबधबा पाहण्यासाठी गेले होते.

या दरम्यान, शिरीष धर्माधिकारी हे पाण्यात उतरले. त्यानंतर त्यांनी मुलगी ऐश्वर्या हिलाही पाण्यात बोलवले. हे दोघेही बराच पाण्यात पोहत होते. या दरम्यान पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही बुडू लागले. या दोघांनी पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी खोली जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. या दरम्यान, एका तरुणाने ऐश्वऱ्याला बाहेर काढले. मात्र ती बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले.

दुसरीकडे शिरीष धर्माधिकारी यांचा शोध लागत नव्हता. आज सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत असून सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या धर्माधिकारी कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us