Site icon Aapli Baramati News

धक्कादायक : मूल होत नसल्यानं ‘त्यानं’ उचललं टोकाचं पाऊल; पुण्यातील घटना..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

आंबेगाव बुद्रुक येथील वेताळनगर परिसरात मूल होत नसल्याने पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्काडायक घटना घडली आहे. काजल देवानंद काळेल (वय २४ वर्षे, रा.वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत काजल हिचे वडील मारुती बाड (वय ५७ वर्षे, रा. भिवंडी, ठाणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

देवानंद मच्छिंद्र काळेल  (वय ३० वर्षे, रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे माण येथील रहिवासी असलेला देवानंद पुण्यात पेंटिंगचे काम करत होता. काजल आणि देवानंद यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. परंतु लग्न होऊन अनेक वर्षे उलटली तरी त्यांना मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे ते पत्नीला वारंवार त्रास देऊ लागला. त्याचबरोबर किरकोळ कारणांवरूनही पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला.

शुक्रवारी रात्री याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाली. भांडणे टोकाला गेल्याने त्याने काजलचा गळा आवळून खून केला. या प्रकरणाची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत देवानंद याला अटक केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी अधिक तपास सुरु असल्याची माहिती दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version