Site icon Aapli Baramati News

पुण्याचा पाच वर्षाचा विकास पाण्यात वाहत आहे : जयंत पाटील यांची टिका

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

काल राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. पुणे शहरातही काल मुसळधार पावसाने थैमान घातलं. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरात दुकाने, घरे अनेकांचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे गाड्या वाहून गेल्याची चित्र काल पुण्यात होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ‘पुण्याचा पाच वर्षाचा विकास पाण्यात वाहत आहे’ अशा शब्दात हल्ला चढवला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शहरामध्ये अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी’ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे.

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून गेल्या पाच वर्षात पुण्याचा विकास झाला असल्याचे बोलले जात आहे. परंतु कालच्या पावसाने पुणे शहरातील नागरिकांचे झालेले हाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले आहे. तसेच समाजमाध्यमांमध्येही भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version