पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची नेहमीच चर्चा होत असते. आताही पुण्यात अजितदादांच्या रविवारी होणाऱ्या दौऱ्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण दिवसभरात तब्बल १७ कार्यक्रमांना अजितदादा हजेरी लावणार आहेत. त्या निमित्ताने पुणेकरांनाही अजितदादांचा झंझावात अनुभवायला मिळणार आहे.
सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सर्वाधिक जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. त्यातूनही त्यांनी पुण्यासाठी वेळ दिला असून रविवारी दि. १३ मार्च रोजी तब्बल १७ कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.
अजित पवार हे नेहमीच भल्या पहाटेपासून आपल्या कामाला सुरुवात करत असतात. रविवारीही ते पुण्यात सकाळी ७ वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. त्या निमित्ताने पुणेकरांना अजितदादांचा झंझावात अनुभवायला मिळणार आहे.
अजितदादांचा रविवार दि. १३ मार्च रोजीचा पुणे दौरा
■ सकाळी ७.०० वाजता सुस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामांची पाहणी
■ सकाळी ७.३० वाजता वारजे माळवाडी येथे क्रीडा संकुल व क्लब हाऊस- भूमिपूजन समारंभ
■ सकाळी ८.०० वाजता- वारजे येथे कै. सुभदा प्रभाकर बराटे मल्टिस्पेशालिटी व मॅटर्निटी रूग्णालयास सदिच्छा भेट
■ सकाळी ८.३० वाजता- शिवणे येथे शिवणे-नांदेड पूलाचा उद्घाटन समारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन
■ सकाळी ९.०० वाजता कात्रज डेअरी सरहद शाळा चौक येथे
कात्रज डेअरीमधून जाणारा २४ मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा
■ सकाळी ९.४५ वाजता- राजीव गांधी नगर बालाजी नगर, पुणे येथे स्व.माणिकचंद नारायणदास दुगड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा
■ सकाळी -१०.२५ वाजता- सुखसागर नगर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा
१) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम क्रीडा संकुल
२) पोलीस चौकी
३)महिला बचत गट कार्यालय ४) कै. किसनराव माऊली कदम उद्यान प्रयाण
■ सकाळी ११.०० मिठानगर, काँढवा खुर्द, येथे
१) माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृहाचा लोकार्पण सोहळा
२) हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटचा लोकार्पण सोहळा
■ सकाळी-११.४५ वाजता- कौसर बाग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम
१) डॉ. सय्यदना मोहम्मद बुराउद्दीन उद्यान
२) ‘बाग जन्नत’ कब्रस्तान ३)मुख्य भैरोबानाला ते एन.आय.बी.एम परिसर मलवाहिनी
■ दुपारी – १२.३० वाजता वानवडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन / लोकार्पण सोहळा
१) ४५ फूट उंच राष्ट्रध्वज भूमिपूजन
२) १०० बेडचे रूग्णालय व ३) बॅडमिंटन हॉल लोकार्पण
■ दुपारी १.१५ वाजता ११० रामटेकडी, प्रभाग क्र. २४ येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा –
१) पंचशील बुद्ध विहार
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन
■ दुपारी ३.०० वाजता
कृषिभवन, शिवाजीनगर येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव कार्यक्रमास भेट
■ दुपारी ४.१० वाजता पंचशील चौक, ताडीवाला रोड, पुणे येथे आगमन नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण
■ दुपारी ४.३० वाजता प्रभाग क्र. फुलेनगर-नागपूर चाळ, आळंदी रोड येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन
■ सायंकाळी ५.१५ वाजता धानोरी जकात नाका, धानोरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
१) राजयोग मेडिटेशन सेंटर
२) अग्निशामक केंद्र
३) माजी सैनिक सांस्कृतिक भवन
४) भव्य उद्यान
■ सायंकाळी ६.०० वाजता वडगांव शिंदे रोड, लोहगाव, येथे’ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल’ भूमिपूजन सोहळा
■ सायंकाळी ६.५० वाजता प्रभाग क्रं. ०३, खराडी, येथेऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन व सभा