आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

PUNE BREAKING : पुणे विद्यापीठात राडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरुन दोन संघटना आमनेसामने

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरुन मोठा राडा झाला आहे. या लिखाणावरुन अभाविपने जोरदार निदर्शने केली. यादरम्यान, त्यांची स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यातून विद्यापीठ परिसरात चांगलाच राडा झाला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आठ नंबरच्या वसतीगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीचे चित्र काढण्यात आले होते. त्यावर आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. या घटनेचा निषेध नोंदवत अभाविपने संबंधितांना अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. विद्यापीठाकडून कारवाई न झाल्यामुळे आज अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली.

विद्यापीठ परिसरात अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला. या दरम्यान या कार्यकर्त्यांची एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी बाचाबाची झाली. त्यातून या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे मोठा राडा झाला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड करत शांत राहण्याचे आवाहन केले. सुमारे एक तास हा सगळा गोंधळ सुरू होता. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विद्यापीठ परिसरातील तणाव निवळला. मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी विद्यापीठ परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us