Site icon Aapli Baramati News

Political : रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादीने सोपवली ‘ही’ जबाबदारी..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मनसेतून राष्ट्रवादीत आल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांना महत्वाची जबाबदारी दिली जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांना पक्षाने उपाध्यक्षपद दिले आहे. आक्रमक शैली असलेल्या रुपाली पाटील यांनी अनेक प्रकरणांमध्ये आवाज उठवला आहे. त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे संघटन अधिक मजबूत होण्यास फायदा होणार असल्याने त्यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते रुपाली पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याबद्दल रुपाली पाटील यांनी समाधान व्यक्त करत मिळालेल्या संधीच्या माध्यमातून दमदार काम करत पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version