आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

Political Breaking : ..तर मुख्यमंत्र्यांनीही आपला कार्यभार मुख्य सचिवांकडेच द्यावा : अजितदादांचा टोला

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांच्या सचिवांना अधिकार घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सचिवच जर काम पाहणार असतील, तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा देऊन मुख्य सचिवांकडे कार्यभार सोपवावा असा टोला लगावला आहे.

आज पुण्यात विविध कार्यक्रमांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजेरी लावली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजितदादांनी जोरदार टोलेबाजी केली. राज्यात मंत्रीमंडळ विस्तार लांबलेला असताना सचिवांना अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, जर अशा प्रकारे प्रशासन चालणार असेल तर अवघड परिस्थिती आहे.

लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश करायचा नाही आणि अधिकाऱ्यांना अधिकार द्यायचे अशा प्रकारची परिस्थिती कधीच आली नव्हती. हे जर खरोखर घडलेलं असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनीच या निर्णयाबद्दल महाराष्ट्राला उत्तर द्यायला हवं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us