Site icon Aapli Baramati News

पुणे जिल्ह्यातील ‘या’ पंचायत समितींवर आता ‘प्रशासक राज’

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने आता या पंचायत समितींवर प्रशासक राज असणार आहे. या समितीचा कार्यकाळ १२  मार्च रोजी पूर्ण झाल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ, हवेली, पुरंदर, दौंड, वेल्हा, भोर, इंदापूर आणि बारामती या पंचायत समितीचा कारभार आता गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून पाहतील. त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत २० मार्चला संपणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सगळे अधिकार २१ मार्चपासून जाणार आहेत.

गट आणि गणांची रचना महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मुदतीपूर्वी जाहीर केल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु गट आणि गणांची रचना जाहीर न झाल्याने आणि निवडणूका सहा महिने लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसल्याने सदस्यांचा हिरमोड झाला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version