आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

मूल होत नसल्याने सासरच्यांनी केला जाच; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

लग्नानंतर मूल होत नसल्याने सासरच्या माणसांकडून फुरसुंगी येथील एका महिलेचा जाच होत होता. या जाचाला कंटाळून त्या महिलेने आपले जीवन संपवले आहे. आसावरी सचिन धुमाळ (वय २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेचा भाऊ रोहन गोविंद पोळ (वय २५, रा.जेजुरी,पुरंदर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

तक्रारीवरुन पोलिसांनी पती सचिन वसंत धुमाळ (वय ३३) सासरे वसंत पांडुरंग धुमाळ (वय ६५) सासु वंदना वसंत धुमाळ (वय ६०), दीर स्वप्नील वसंत धुमाळ (वय २८) आणि जाऊ अंजली स्वप्नील धुमाळ (वय २५, सर्व रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

२०१४ मध्ये आसावरी आणि सचिनचा विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर या दोघांना मूल होत नव्हते. त्यामुळे सासरच्या लोकांकडून तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. तिला तिच्या पती साठी दुसरी मुलगी बघायला घेऊन गेले होते. त्यामुळे तिने या जाचाला कंटाळून २६ मार्च रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या भावाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक थोरात करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us