आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

कोश्यारी यांच्यासारखे कर्तुत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत : शरद पवार यांचा टोला

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रगीत न म्हणताच, अभिभाषण सोडून गेल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भगतसिंग कोश्यारी यांच्या बद्दल बोलताना, मी भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे कर्तुत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत, असा टोला लगावला आहे.

शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यापासून अनेक प्रकार घडत आहेत. जेव्हा मी राज्यकर्ता म्हणून काम केले. त्यावेळी अनेक कर्तुत्ववान राज्यपालांचे राज्यासाठी काम पाहता आले. यामध्ये पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपालही आम्हाला पाहायला मिळाले. मात्र हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न करणेच चांगले, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

मी अनेक राज्यपाल पाहिले आहेत. मात्र भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखा कर्तुत्ववान राज्यपाल पाहिला नाही. घटनात्मक पदावर नेमण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. एक वर्षे होऊन गेली आहे. तरीसुद्धा १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नेमणूक करत नाहीत. राज्यपालांसारखी व्यक्ती निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून पदाची प्रतिष्ठा ठेवणार नसतील, तर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी याबाबत विचार करायला हवा, असेही शरद पवार यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us