आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

‘त्याने’ प्रसंगावधान राखल्यानं वाचला दांपत्याचा जीव; इंदापूर तालुक्यातील थरारक घटना..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे वृध्द दांपत्याच्या दुचाकीचा ब्रेक निकामी झाला होता. ही बाब पाहणाऱ्या तरुणाने वेळीच प्रसंगावधन राखत ती दुचाकी धावत जाऊन पकडली. त्यामुळे या दांपत्याचा जीव वाचला. नशीब बलवत्तर असल्यानं आणि या तरुणानं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ टळला.

रियाज मुलाणी असे या धाडसी तरुणाचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी की,  पुणे जिल्ह्यातील इंदापूर जंक्शन येथे ही घटना घडली. एका वृद्ध दाम्पत्याची दुचाकीचा ब्रेक निकामी झाला होता. त्यामुळे दुचाकीवर नियंत्रण राहिले नव्हते. ब्रेकच निकामी झाल्यामुळे ही दुचाकी वेगात धावत होती. हे दृश्य रियाज मुलाणी हा पाहत होता. संबंधित दुचाकीचा काहीतरी बिघाड झाला असल्याचे त्याच्या लक्षात आले.

रियाजने वेळीच सावध होत त्या दुचाकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला.  त्याने दुचाकीचा पाठलाग करत ती दुचाकी पकडून नियंत्रण मिळवले. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसामुळे त्या दुचाकीवरील  दांपत्याचा जीवही वाचला. त्यामुळे रियाजच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.al


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us