आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

बटाट्याचा पाला खाल्ल्यानं चाळीस गाईंना विषबाधा; वीस गाईंचा मृत्यू, निरगुडसर येथील घटना

पुणे
ह्याचा प्रसार करा

आंबेगाव : प्रतिनिधी

बटाट्याचा पाला खालल्यामुळे जवळपास ४० गाईंना विषबाधा झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे घडली आहे. या घटनेत १६ मोठ्या गाई आणि  ४ कालवडी अशा २० गाईंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जवळपास १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या विषबाधेच्या घटनेमुळे आणखी गाई दगावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर-मेंगडेवाडी हद्दीत राजस्थान येथून आलेले व्यावसायिक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे जवळपास १५० गाई आणि वासरे आहेत. त्यातूनच ते आपला उदरनिर्वाह चालवतात. लाल गाई पाळणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. दूध आणि शेणखत विक्री करून ते उत्पन्न मिळवत असतात. निरगुडसर परिसरातील शेतांमध्ये ते आपल्या गाई चरण्यासाठी नेत असतात.

दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतातून हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी बटाट्याचा पाला आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गाईंना मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत २० गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. तर ३० ते ४० गाया या बाधित आहेत. या घटनेनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गाईंवर उपचार सुरू केले आहेत.

या विषबाधेमुळे संबंधित व्यावसायिकांचे जवळपास १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच अजूनही काही गाई बाधित असल्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.


ह्याचा प्रसार करा
पुणे

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us