Site icon Aapli Baramati News

दौंड तालुक्यातील ओढ्यांवरील पूलांना येणार झळाळी; पूलांच्या बांधकामासाठी ५ कोटी ८७ लाखांचा निधी : आमदार राहुल कुल यांची माहिती

ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील ओढ्यावरील ४ छोट्या पुलांच्या बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत सुमारे ५ कोटी ८७ लक्ष रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामांची निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही कुल यांनी सांगितले.

दौंड तालुक्यातील काही ठिकाणी लहान पुलांची दुरवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार राहुल कुल यांनी पुरवणी मागण्यांमध्ये या पूलांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार या पुलांची नव्याने बांधणी करण्यासाठी राज्याच्या जुलै २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पीय (पावसाळी) अधिवेशनात नाबार्ड २८ अंतर्गत सुमारे 5 कोटी ८७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुरवणी अर्थसंकल्पात कासुर्डी गावाजवळ कॅनॉलवर  लहान पूल बांधकामासाठी १ कोटी ३५ लाख, नांदूर गावाजवळ ओढ्यावर लहान पुलासाठी १ कोटी ७० लाख, दहिटणे गावालगत सटवाईच्या ओढ्यावर  लहान पुलासाठी १ कोटी १० लाख, मळद गावालगत ओढ्यावर लहान पूल बांधकामासाठी १ कोटी ७२ लाख रुपये  अशा प्रकारे निधी मंजूर करण्यात आला आहे.

या सर्व पूलांचे काम सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे यांचेमार्फत करण्यात येणार आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version