
पुणे : प्रतिनिधी
आजकाल चोरटे चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवतील याचा काही अंदाज नाही. अशीच विचित्र घटना पुण्यात घडली आहे. काही चोरट्यांनी सराफी दुकानात चोरी करण्यासाठी शेजारीच एक दुकान भाड्याने घेतले. त्यानंतर त्यांनी भरदिवसा त्या दुकानामधील भिंत फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे.
पुण्यातील वारजे माळवाडी येथील गणपती माथा परिसरात एका व्यक्तीचे सराफाचे दुकान आहे. हा व्यक्ती तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे दुपारी जेवणासाठी घरी गेला होता. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुकानात परत आले आल्यानंतर चोरी झाल्याचे समजले. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ वारजे माळवाडी पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत चोरीला गेलेल्या मुद्देमाल यांची नोंद करणे सुरू होते. दरम्यान, ही चोरी चोरट्यांनी भिंत फोडून केली असल्याचे तपासात समोर आले आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी दागदागिने आणि पैशांची चोरी केली आहे. अधिक तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहेत.