Site icon Aapli Baramati News

ग्राहकाला रॉडने मारहाण; हॉटेलच्या मालकासह साथीदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

आंबेगाव येथील एका हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला मारहाण करून दोघेजण फरार झाल्याची घटना घडली होती. या दोघांनाही भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. याबाबत अमोल देवगिरीकर यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

जय पांडुरंग निकम ( वय २१ वर्षे,  रा. जांभूळवाडी रोड, दत्तनगर कात्रज)  आणि प्रशांत प्रकाश जाधव ( वय २१ वर्षे,  रा. जांभूळवाडी रोड, दत्तनगर कात्रज) अशी या दोघांची नावे आहेत. आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा हॉटेलमध्ये रविवारी अमोल देवगिरीकर हे पार्सल घेत होते. पार्सल घेत असताना हॉटेलचे मालक जय निकम आणि प्रशांत जाधव यांच्यात शाब्दिक वाद झाला. याच वादातून त्यांनी अमोल यांना शिवीगाळ करून स्टीलचा रॉड  डोक्यात घातला.

या घटनेनंतर दोघेही पळून गेले होते. पोलिसांनी सापळा रचत या दोघांनाही अटक केली आहे. पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, आणि पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार गणेश भोसले, सचिन पवार, रवींद्र चिप्पा, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, संजय गाडे, गणेश शेंडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत आणि अवधूत जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version