Site icon Aapli Baramati News

CRIME NEWS : उसन्या पैशांच्या वादातून दोघा मित्रांनी धारदार शस्त्राने वार करत केला पीएमपी चालकाचा खून; पुणे शहरातील धक्कादायक घटना

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोघांनी दारूच्या नशेत एका पीएमपी चालकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरात ही घटना घडली असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) असे या घटनेत मृत पावलेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी सोमनाथ अशोक कुंभार ( वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. धनकवडी) या दोघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्री दिवेकर, कुंभार व पाटेकर दारू पीत बसले होते. या दरम्यान त्यांच्यात उसने घेतलेल्या पैशांवरून वाद झाला. त्यातूनच सोमनाथ कुंभार आणि रोहित पाटेकर या दोघांनी धारदार शस्त्राने वार करत राजेंद्र दिवेकर यांचा खून केला. हा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला.

दरम्यान, रात्रभर पती घरी आले नाहीत, त्यामुळे दिवेकर यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती. या दारम्यानच त्यांना राजेंद्र दिवेकर यांचा खून झाल्याचं समजलं. त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version