Site icon Aapli Baramati News

CRIME NEWS : पतीच्या प्रेमसंबंधांमुळे राहिली वेगळी; नंतर सूत जुळलं.. पण प्रेयसीला नाही पटलं.. बांबूने मारहाण करत म्हणाली, तू तर साप..

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पतीच्या प्रेम प्रकरणामुळे वेगळे राहणाऱ्या आणि नंतर पुन्हा सूत जमवलेल्या पत्नीला प्रेयसीच्या रागाला सामोरे जावे लागल्याची घटना पुणे शहरातील महंमदवाडीत घडली आहे. तू त्यांच्यासोबत साप बनून राहतेस, त्याला सोडून जा असं म्हणत संबंधित प्रेयसीने पत्नीला बांबूने मारहाण करत चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, संबंधित फिर्यादी पत्नी आणि तिचा पती पुण्यातील महंमदवाडी येथे वास्तव्यास आहेत. मागील काही काळात पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्यामुळे पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेत वेगळे राहण्यास सुरुवात केली होती. मात्र नंतर दोघांमध्येही समझोता झाल्यामुळे पत्नी पुन्हा पतीसोबत राहायला लागली. याचाच प्रेयसीला राग येत होता.

शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संबंधित २७ वर्षीय प्रेयसी ही महंमदवाडीत आली. तू त्याची जिंदगी का खराब करतेस, तू साप बनून त्याच्यासोबत राहत आहेस. तू त्याला सोडून जा, असे म्हणत बांबूने हात-पायासह डोक्यात मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तिने फिर्यादी महिलेला जोरदार चावाही घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित २९ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार हे अधिक तपास करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version