आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

CRIME NEWS : कर्जबाजारीपणामुळे स्वतः:च्या खुनाचा रचला बनाव; न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

पुणे
ह्याचा प्रसार करा

सासवड : प्रतिनिधी
कर्जबाजारीपणामुळे आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीचा खून करून स्वतःच्या खुनाचा बनाव रचणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि ३ लाख २५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सुनावली आहे.

विठ्ठल तुकाराम चव्हाण (वय ४५, रा. बारामती, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. विठ्ठल चव्हाण हा कर्जबाजारी झाला होता. तसेच त्याचे कौटुंबिक वादही सुरु होते. त्यामुळे त्याने आपल्या साथीदारासह त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या विनायक उर्फ पिंटू ताराचंद तळेकर (वय ३२, रा. कोडीत, ता. पुरंदर) याचा खून करत स्वतःच्या खुनाचा बनाव रचला होता.

विनायक तळेकर याला दारू पाजून खेड शिवापूरमार्गे मरिआई घाटात नेले. त्या ठिकाणी त्याला मारहाण करून त्याच्या अंगावर आणि वाहनावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. सासवड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांनी या प्रकरणाचा तपास करत विठ्ठल चव्हाण याच्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली होती.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील ॲड. चंद्रकिरण साळवी यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यानुसार न्यायालयाने विठ्ठल चव्हाण याला जन्मठेप आणि ३ लाख २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक फाैजदार विद्याधर निचित, संदीप चांदगुडे, शशिकांत वाघमारे यांनी या खटल्यात विशेष सहकार्य केले.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us