Site icon Aapli Baramati News

CRIME NEWS : मैत्रीचा घेतला गैरफायदा; नोकरीनिमित्त आलेल्या मित्राने विवाहितेला ब्लॅकमेल करत केलं ‘हे’ घृणास्पद कृत्य

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

नोकरीसाठी पुण्यात वास्तव्यास आलेल्या मित्राची स्वत:च्या घरी राहण्याची सोय केल्याचा गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्राच्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तिच्याकडून पैसेही उकळल्याचे समोर आले असून या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघोली येथे वास्तव्यास असणाऱ्या पीडित महिलेच्या पतीने त्याच्या एका मित्राला कामासाठी पुण्यात बोलावले होते. त्याला एका ठिकाणी कामही मिळवून दिले होते. त्याची राहण्याची सोय नसल्यामुळे या महिलेच्या पतीने त्याला आपल्याच घरी राहण्याची सोय केली होती. या दरम्यान, एक दिवस हा मित्र कामावर गेल्यानंतर त्याने पीडितेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढला.

हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने संबंधित महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता त्याने या महिलेला पैशांचीही मागणी केली. सुरुवातीला या महिलेने भीतीपोटी त्याला ५० हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा त्याने साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याच्याकडून दिली जात होती.

एप्रिलपासून १२ डिसेंबरपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे या महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीवर भादंवि कलम ३७६, ३५४ अ, ३८४, ३८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version