आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

CRIME NEWS : पुण्यात चौकशीसाठी तुरुंगाबाहेर आणलेल्या मोक्कातील आरोपीने केला पोबारा; पोलीस दलात खळबळ

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात मोक्का लावलेल्या एका आरोपीने चौकशीदरम्यान खानापूर येथून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून आरोपी पळून गेल्याची घटना घडलेली असताना आता आणखी एका आरोपीने पलायन केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संतोष बाळू पवार असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष पवार याने बंदुकीचा धाक दाखवत मार्केटयार्ड परिसरातील अंगडिया कार्यालयातील रक्कम लुटली होती. या प्रकरणात संतोष पवारसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.

मागील काही दिवसांपासून संतोष पवार हा पोलीस कोठडीत होता. त्याला काल एका गुन्ह्यातील चौकशीसाठी खानापूर येथील त्याच्या घरी नेण्यात आले होते. या दरम्यान पोलीस आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांमध्ये वाद झाला. या वादातच संतोष पवारने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या शोधासाठी पथके नेमण्यात आली आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या आरोपीला चौकशीसाठी नेताना स्थानिक पोलिसांची मदत घेतली नाही, तसेच त्याला सायंकाळच्या वेळी नेले अशा अनेक बाबी या घटनेमुळे समोर आल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीसांवर काय कारवाई होणार याकडेच लक्ष लागलं आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us