Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : उधार दिलेल्या पैशांसाठी महिलेवर पतीसमोरच अत्याचार; हडपसर पोलिसांनी आरोपीची भर पावसात धिंड काढत दिला दणका..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

उधारीवर घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे एका विकृताने चाकूचा धाक दाखवत पतीसमोरच त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती.  या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक करत भरपावसात त्याची धिंड काढली. पोलिसांच्या या दणक्याची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.

इम्तियाज हशीम शेख (वय ४७, रा. हडपसर) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. एका ३४ वर्षीय महिलेने याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी इम्तियाज शेख याने पीडित महिलेच्या पतीला ४० हजार रुपये उसने दिले होते. मात्र काही अडचणींमुळे हे पैसे परत करता आले नव्हते. त्यामुळे आरोपीने फेब्रुवारी महिन्यात या महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या दरम्यान, इम्तियाजने या दोघांना सुरक्षानगर परिसरात बोलावून घेतले . त्या ठिकाणी पीडितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवत त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर संबंधित पती-पत्नीने कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र पीडितेने या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिला या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल करण्याची धमकी दिली.

या सर्व प्रकारानंतर संबंधित पीडितेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी या आरोपीची भर पावसात हडपसर परिसरातून धिंडही काढली. त्यामुळे सध्या पोलिसांनी केलेल्या या करेक्ट कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version