आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

CRIME BREAKING : ‘द डॉन ऑफ सिंहगड रोड’ टोळीचा हवेली पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम; जिथे दहशत माजवली, त्याच परिसरात भर पावसात काढली धिंड..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

सोशल मिडियावर ‘द डॉन ऑफ सिंहगड रोड’ संबोधणाऱ्या सराईत गुन्हेगार रवी जाधव याच्यासह त्याच्या टोळीचा हवेली पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे. पोलिसांनी भर पावसात रवी जाधव व त्याच्या टोळीची सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा परिसरात धिंड काढत या टोळीची दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

दहशत माजवणे, खून आणि खूनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर असलेल्या सराईत गुन्हेगार रवी जाधव व त्याच्या साथीदारांनी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका तरुणाला किरकटवाडी येथे बेदम मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हवेली पोलिसांनी रवी जाधव (वय २६, रा. रायकर मळा, धायरी) याच्यासह अभिषेक विष्णू पवार (वय २१, ऋतुजा रेसिडेन्सी, धायरी), गणेश तुळशीराम पवार (वय २१, रा. लेबर कॅम्प, नांदेडगाव), आदेश तानाजी कडू (वय २१, महादेवनगर, नांदेडगाव), गौरव पवार (वय २१)  आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. भर दिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने ज्या भागात ही मारहाणीची घटना घडली, त्या ठिकाणी या ‘द डॉन ऑफ सिंहगड रोड’ टोळीला आणून त्यांची भरपावसात धिंड काढली. तपासाचा भाग असला तरी स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत नष्ट करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा आयपीएस अनमोल मित्तल यांनी सांगितले. संबंधित गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचेही मित्तल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मागील काही दिवसांत सिंहगड रोड परिसरात काही गुन्हेगारी टोळ्या डोके वर काढत आहेत. त्यांच्याकडून सुरू असलेल्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर किरकटवाडी ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. या गुन्हेगारांची दहशत मोडीत काढून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील असल्याची माहिती प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांनी दिली.


ह्याचा प्रसार करा
पुणे

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us