Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : पत्नीला आधी ब्ल्यू फिल्म दाखवली, नंतर अनैसर्गिक संबंध केला आणि नग्न अवस्थेत नाचायला लावून शूटिंग केलं; पुण्यातल्या धक्कादायक घटनेनं उडाली खळबळ..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

पत्नीला ब्ल्यू फिल्म दाखवून नंतर तिच्याशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करून तिला नग्न अवस्थेत नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पत्नीला नाचायला लावून शूटिंग केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पुणे शहरातील समर्थ पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३१ वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संबंधित पीडितेचा २०१५ साली विवाह झाला होता. फिर्यादीचा पती हा तिला वारंवार ब्ल्यू फिल्म दाखवून त्यानुसार तिच्याशी संभोग करायचा. तसेच तिला विवस्त्र करून नाचायला सांगून शूटिंगही करायचा. एवढ्यावरच न थांबता तिच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करत होता.

फिर्यादी महिलेने विरोध केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिचा पती देत होता. त्यामुळे कंटाळून ही महिला माहेरी निघून गेली. त्यावेळी आरोपी पतीने तिच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीची बहीण काम करत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवत असल्याचं पत्र पाठवून तिची बदनामीही केली.

या सर्व प्रकारामुळे या महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे हे पुढील तपास करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version