Site icon Aapli Baramati News

Crime Breaking : तुझे मेरे लियेही लाया हू.. असं म्हणत सासराच बनला हैवान; पुण्यातील धक्कादायक घटना..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

एखाद्या वासनांध व्यक्तीला नात्यांशी काही देणंघेणं नसतं. अशा नराधमांकडून पवित्र नात्यालाही काळिमा फासला जातो. अशीच एक घटना पुण्यात उघड झाली आहे. लग्नानंतर घरी आलेल्या सूनेला ‘तुझे मेरे लिए ही लाया हू, तु मुझे खुश कर, मै तुझे खुश रखुंगा’ असे म्हणत तिच्यावर सासऱ्यानेच वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पुणे शहरातील सहकारनगर पोलिसांनी तळजाई पठार येथे वास्तव्यास असलेल्या एका ४७ वर्षाच्या हैवान सासऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत यवतमाळ येथील एका २२ वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, संबंधित विवाहितेचे लग्न झाल्यापासून आरोपी सासरा हा तिला मुलीसारखे प्रेम करीत असल्याचे भासवत असे.

एके दिवशी संबंधित विवाहितेची सासू कर्नाटकात गावी गेली होती. त्या दरम्यान तिचा पतीही घरी नव्हता. घरात कोणीही नसल्याचे पाहून हा हैवान बेडरुममध्ये आला. त्याने आपली सुनेला बिलगण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने त्याला बाजूला ढकलून दिले. ‘तुझे मेरे लिए ही लाया हू, तु मुझे खुश कर, मै तुझे खुश रखुंगा’ असे म्हणत त्याने संबंधित विवाहितेवर अत्याचार केला.

दरम्यानच्या काळात याबद्दल काही बोललीस तर जीवे मारीन अशीही धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्याचा गैरफायदा घेत या नराधम सासऱ्याने या विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. घरातील लोकांना तिच्याबद्दल भडकावून तिला माहेरी जाण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या विवाहितेने याबाबत यवतमाळमध्ये तक्रार दाखल केली असून ती सहकारनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version