Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : १३ वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

ह्याचा प्रसार करा

वालचंदनगर : प्रतिनिधी

इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन भोळसर आणि अपंग मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात घडली आहे. संबंधित मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी शुभांगी अमोल कुचेकर (वय २५, रा. चिखली फाटा, लासुर्णे),  अनिल नलवडे, नाना बागडे (दोघेही रा. गोतोंडी) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर शुभांगी कुचेकर हिला अटक करण्यात आली आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका मोठ्या गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अपंग व भोळसर मुलीला नोव्हेंबर २०२१ मध्ये शुंभागी कुचेकर हिने गोड बोलून फिरायला नेले. यावेळी गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या शेतात पाठविल्याचा प्रकार घडला.

त्यानंतर एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला. गेल्या आठवड्यामध्ये संबधित मुलीच्या पोटात दुखत असल्याने बारामतीमधील रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचे समोर आले.

याबाबत मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये अनिल नलवडे याने संबंधित मुलीवर बलात्कार केल्यामुळे संबधित पिडीत मुलगी गरोदर झाली आहे. बलात्कारासाठी शुंभागी कुचेकर व नाना बागडे यांनी सहकार्य केल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे व पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version