Site icon Aapli Baramati News

गांजा विक्रीसाठी आला अन् पोलिसांच्या हाती लागला; चाकणमध्ये २० किलो गांजासह एकाला अटक

ह्याचा प्रसार करा

चाकण : प्रतिनिधी  

पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ गांजा विकण्यासाठी आलेल्या एकाला चाकण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

आशिष शिवपूजन पांडे (वय २८, रा. भुजबळ चौक, वाकड) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा साथीदार साईसिंग (रा. शहादा, जि. नंदुरबार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ एकजण गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने या परिसरात सापळा लावला. त्यानंतर आशिष याला ताब्यात घेत त्याची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये २० किलो २२१ ग्राम गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ४१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version