पुणे : प्रतिनिधी
फुकट भाजी दिली नाही म्हणुन एका तरुण विक्रेत्याला पाया पडायला लावल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून ही घटना उघडकीस आली आहे.हा संपुर्ण प्रकार धनकवडी परिसरातील बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर येथे घडला आहे.
संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुण विक्रेत्याला त्याच्या आईसमोर कपडे फाटेपर्यंत या गुंडांनी मारहाण केली आहे. त्यानंतर त्याला बळजबरीने पाया पडायला देखील लावले आहे.या भागात राहणाऱ्या नागरिकांची छेड काढणे, त्यांना हत्यारे दाखवून धमकी देणे यासारखे अनेक प्रकार या भागात वारंवार घडत आहेत.
https://www.facebook.com/watch?v=310969681123240
याबाबत नागरिकांनी सहकारनगर पोलिस स्टेशनकडे तक्रारी दिल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट सहकारनगर आणि धनकवडी पोलिस स्टेशनमधून या नागरीकांना दुसरीकडे राहण्यास पोलीस सांगतात. त्यामुळे पोलिसच या गुंडांना घाबरतात का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.