Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : पुण्यात स्वाईन फ्लूचा फैलाव; तीन दिवसांत ६७ रुग्ण, एकाचा मृत्यू

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

कोरोनाच्या थैमानातून महाराष्ट्र बाहेर पडलेला असताना आता स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. पुण्यात तीन दिवसांत ६७ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची धाकधूक वाढली आहे.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या काळात सर्वसामान्यांचे अक्षरश: हाल झाले होते. त्यातून बाहेर पडून जनजीवन सुरळीत होत असतानाच आता स्वाईन फ्लूचा प्रसार वाढताना दिसत आहे. पुणे शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन दिवसात १६६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६७ जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दुसरीकडे गुरुवारी पुण्यातील एका बाधित रुग्णाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या संसर्गाचा वेग वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांची धाकधूक वाढली असून प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ही आहेत लक्षणे..!

स्वाईन फ्लू बाधितांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येत आहेत. अशा प्रकारचा त्रास असणाऱ्या नागरिकांनी तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कोरोनानंतर स्वाईन फ्लूचा हाहाकार पहायला मिळत असल्याने नागरिकांनी अधिकची दक्षता घेणे गरजेचे आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version