आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG NEWS : झोमॅटोचं स्पष्टीकरण; तरुणीची छेड काढणारा ‘तो’ झोमॅटोचा डिलिव्हरी पार्टनरच नाही..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील येवलेवाडीमध्ये झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेवर आता झोमॅटोकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. संबंधित डिलिव्हरी बॉय हा झोमॅटोचा कर्मचारी नव्हता असं कंपनीनं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी तपास कार्यात आम्ही सहकार्य करत आहोत, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

झोमॅटोनं म्हटलं की, “आरोपी हा झोमॅटोचा डिलिव्हरी पार्टनर नव्हता. आम्ही या प्रकरणाच्या तापसासाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आमच्या डिलिव्हरी बॉयच्या ताफ्यात सामिल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आम्ही त्रयस्त कंपनीकडून व्हेरिफिकेशन करतो. आमच्याकडे याबाबत शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्यात आलं आहे.

नक्की काय घडलं होतं?

पोलिसांच्या माहितीनुसार, रईस शेख (वय ४०) असं आरोपी फूड डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. त्यानं येवलेवाडीतील एका सोसायटीत शनिवारी रात्री एका १९ वर्षांची तरुणीच्या घरी फूड पार्सल डिलिव्हर केल्यानंतर तिच्या गालावर जबरदस्तीनं चुंबन घेत तिचा विनयभंग केला होता. ही तरुणी एका कॉलेजमध्ये शिकते तसेच ती आपल्या दोन मैत्रिणींसोबत राहते.

शनिवारी रात्री घरी परतल्यानंतर तिने झोमॅटोवरुन जेवण मागवलं. हे जेवणाचं पार्सल घेऊन रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास सोसायटीत दाखल झाला. जेवणाचं पार्सल तरुणीकडं देत त्यानं तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर थँक्यू म्हणण्याच्या बहाण्यानं त्यानं तिचा हात पकडत आपल्याकडं ओढलं आणि तिच्या गालावर दोन वेळा चुंबन घेतलं.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळं तरुणी घाबरली आणि तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं. तसेच या प्रकरणी तीनं पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि काही वेळातच त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची सध्या जामीनावर सुटकाही झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us